बहुजन हिताय संघाचे वतीने विविध उपक्रम
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बहुजन हिताय संघाच्या वतीने डॉ.अनुराधा बेले यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणवाडा,भरतवाडा,वलनी आणि खंडाळा येथील महिला सरपंच, उपसरपंच यांना भेटून त्या त्या गावातील मुला, मुलींना योग्य प्रकारचे शिक्षण मिळावे तसेच नवोदय विद्यालय प्रवेश करिता पुर्व तयारी कशा पद्धतीने करता येईल याचे मार्गदर्शन मिळावे याकरिता पिटेसुर येथे बहुजन हिताय संघाच्या वतीने सध्या 2019 पासून चालवित असलेल्या वर्ग 1 ते 12 वी पर्यंतच्या निःशुल्क शिकवणी वर्गात आप आपल्या गावातील मुला, मुलींनाही पाठविण्याची विनंती करण्यात आली.तसेच ग्रामीण विभागातील मुला, मुलींना योग्य प्रकारचे शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने नागरीकरांची एक सभा बोलविण्याची विनंती सरपंच, उपसरपंच यांना करण्यात आली
यामध्ये प्रामुख्याने अँड बी जी गजभिये , अँड हंसराज भांगे, प्रकाश सोनटक्के, भीमराव मेश्राम, सुरेश पानतावणे,बी टी वाहणे, मनोहर भांगे उपस्थित होते.