25.6 C
New York
Monday, June 24, 2024

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न

 

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न

आंदोलन प्रसंगी शासन विरोधात प्रचंड नारेबाजी

सुरेंद्र इखारे वणी-   विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केलेल्या आवाहनानुसार अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती ग्रामीण व महानगर तर्फे दुपारी ३ ते ६ या कालावधीत धरणे आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली. जुनी पेन्शन योजनेसह इतरही अनेक मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्यामुळे शासनाचे विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. शेवटी शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांना निवेदन देण्यात येऊन शासनाकडे निवेदन त्वरित पाठविण्याबाबत विनंती करण्यात आली.
नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०, २०, ३० वर्षे लाभाची आश्वाशित प्रगती योजना लागू करणे, रिक्त पदे त्वरित भरणे, शाळेच्या वयानुसार अनुदानाचा टप्पा मंजूर करणे, इयत्ता ६ ते ८ ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना हायस्कूल शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करणे, वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रशिक्षण निःशुल्क आयोजित करणे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करणे या इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विदर्भस्तरीय आंदोलन आयोजित केले होते.
अमरावती येथील हे आंदोलन विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संपन्न झालेल्या या आंदोलनात प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, महानगर अध्यक्ष अतुल देशमुख, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार चैनानी, शिक्षकेतर महामंडळाचे कार्याध्यक्ष केशवराव पाटील आदिंची भाषणे झालीत. संचलन जिल्हा कार्यवाह जयंत सराटकर यांनी केले. याप्रसंगी माजी विभागीय कार्यवाह बाबाराव कडू, महानगर कार्यवाह अरविंद चौधरी, निळकंठ गणवीर, गजेंद्र शेंडे, हर्षवर्धन देशमुख रविंद्र मांगलेकर, सुयोग काळबांडे, विनोद सोसे आदि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News