जैताई मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त स्वरसांज पाडवा
* उत्सवात संगीत प्रेमींचा सत्कार*
सुरेन्द्र इखारे वणी – शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या जैताई देवीच्या मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाचा आरंभ श्री अजित खंडारे यांच्या श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणीच्या कलाकारांनी सादर केलेल्या “स्वरसांज पाडवा” या कार्यक्रमाने झाला.
कार्यक्रमाचे मंगलाचरण करताना राधा कुचनकार हिने गणपती गुणपती हे गीत सादर केले. त्यानंतर विविध कलाकारांनी एक पाठोपाठ एक असे भावगीत सादर केले यामध्ये ध्रुव निखाडे (गणनायकाय गणदेवताय), शर्वरी बाविस्कर (राम जन्मला ग सखे) ,लीना हजारे (निशाणा तुला दिसला ना) ,वैष्णवी हनुमंते( मेंदीच्या पानावर), युवराज लोया (सजा दो घर को गुलशन सा) , संजय गोडे (कुठे शोधीसी रामेश्वर) , दिगंबर ठाकरे ( मेरे मा के बराबर कोई नही) , प्राची कोहळे (दिसते मजला सुख स्वप्न नवे) यांनी गीत सादर केली.
या कार्यक्रमात श्री संतोष जोशी यांच्या सुरेख सूत्रसंचालनाने व स्वरसांज पाडवा या कार्यक्रमात संगीत केंद्राच्या कलाकारांनी सजलेल्या या कार्यक्रमात तबल्यावर श्री चरडे सर ,ढोलकवर अक्षय करसे, ऑर्गन वर राकेश आत्राम तर अन्यवाद्य संगत महेंद्र घोगरे यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे सचिव माधव सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या आरंभी श्री अजित खंडारे सर्व सहभागी कलाकार आणि वणीतील ज्येष्ठ संगीत प्रेमी राजाभाऊ बिलोरिया यांचा सत्कार करण्यात आला.