वणीत काँग्रेसची निदर्शने।
लोकतंत्राची हत्याच असल्याचा आरोप।
सुरेन्द्र इखारे वणी – भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचा पार्श्वभूमीवर शुक्रवारी वणीच्या शिवाजी चौकात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या जिल्हा महिला कॉंग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महागाई,बेरोजगारी, खासगीकरण अदानी प्रकरणाची चौकशी व भ्रष्टाचार विरुद्ध राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठविल्याने मोदी सरकरची नाचक्की होत होती त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला ही लोकतंत्राची हत्या असल्याची टीका या पदाधिकाऱ्यांनी केली . यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेसच्यावतीने वणीत निदर्शने करण्यात आली यावेळी महिला काँग्रेस च्या जिल्हा अध्यक्षा वंदना आवारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे, डॉ महेंद्र लोढा, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, संजय खाडे, डॉ मोरेश्वर पावडे, ओम ठाकूर, उत्तम गेडाम,महिला तालुका अध्यक्ष संध्या बोबडे, महिला शहर अध्यक्षा सविता ठेपाले, शालिनी रासेकर, आशा टोंगे, साधना गोहोकार, नीलिमा काळे, वंदना दगडी, प्रेमीला पावडे, मंदा बांगरे, विजयालक्ष्मी अगबट्टलवार, ललिता बारशेट्टीवर, आशा कोराटे, छाया निंदेकर, मंदा काळे, सुरेखा लोडे, अनिता मत्ते, पालाश बोढे, अशोक नागभीडकर, प्रदीप खेकारे, प्रमोद लोणारे, सूरज महारतळे, रितेश तोमस्कर यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.