संदेश ढोले डॉ भालचंद्र फडके पुरस्काराने सन्मानित
नागपूर जयंत साठे प्रतिनिधी: – “आंबेडकरवादी कविता: आकलन व अर्थमिमांसा” या संदेश ढोले यांच्या समीक्षा ग्रंथास डॉ. भालचंद्र फडके राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी नववा वर्धापन दिवस नागपूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी दीपक कुमार खोब्रागडे,प्रा.डाॅ. अनिल काळबांडे, शालिक जिल्हेकर आदी उपस्थित होते. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मोरभवन मधून सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अनेक नामवंत उपस्थित होते. यापूर्वी संदेश ढोले यांचे “एवढेच फक्त सांगता येते” हा कवितासंग्रह व “आखरीच तुव्हच सडाण चिबविन: वैचारिक अर्थमीमांसा” ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या दोन्ही पुस्तकाची समीक्षा प्रांतात जिव्हाळ्याने दखल घेतली असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जयंत साठे, प्रशांत वंजारे, संजय ढोले, आनंद गायकवाड, जनार्दन मोहिते, प्रा. माधव सरकुंडे, राजेंद्र कांबळे, गुणवंत गणवीर आदींनी अभिनंदन केले आहे