स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ” स्वातंत्र्याची अमृत गाथा ” नाट्याचे सादरीकरण
रासेयो स्वयंसेवकांचे जिल्ह्यात कौतुक
सुरेंद्र इखारे वणी :- येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जातो आहे, त्यानिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समाजा मध्ये स्वातंत्र्यविराच्या विचारांना उजाळा मिळावा यासाठी शहीद दिनाच्या निमित्ताने” स्वातंत्र्याची अमृत गाथा” या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले . संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांचे कडून यवतमाळ जिल्ह्यातील लोकमान्य टिळक महाविद्यालया ची निवड या नाट्याच्या सादरीकरणासाठी कराण्यात आली.
महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सुरू असणाऱ्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र मुंबई , राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्टिस्टिक ह्युमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी एकाच वेळी महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले . लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रसाद खांनझोडे यांचे भरपूर प्रोत्साहन लाभले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलिमा दवणे यांच्या मार्गदर्शनात वैष्णवी निखाडे ,
सागर क्षीरसागर,रवी शेगर,दीक्षा तेलंग,करण ढूरके, समृद्धी ताकसांडे, अब्रार शेख,विनय पुराणकर ,निखिल वाघाडे
गौरी ढेंगळे ,साई दुधलकर,
गौरव नायनवार ,संजना देवगडे , प्रवृत्ती तेलंग,रोशन डाहुले विनोद शिंदे, योगेश कॉलर,अंकुश झाडे,सेजल येसेकर,तृप्ती वाघमारे या सर्व स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण केले . महाविद्यालयातिल प्रध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि महाविद्यायातील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .