12.9 C
New York
Monday, May 20, 2024

आगामी सण उत्सवा संबंधात दीपक टॉकीज चौकात पोलिसांचा मॉक ड्रिल    

आगामी सण उत्सवा संबंधात दिपक टॉकीज चौकात पोलिसांचा मॉक ड्रिल    

सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन 

सुरेन्द्र इखारे वणी येथे आगामी सण उत्सवा संबंधात वणी पोलीस विभागाने मिरवणुका शांततेत पार पडावी. या दृष्टीने दिनांक 29 मार्चला शहरातील दीपक टॉकीज चौकात  मॉकड्रिल घेण्यात आले .  या मॉक ड्रिल मध्ये अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या पोलीस जवानांनी गर्दीचा सामना कसा करायचा आणि मिरवणुकी दरम्यान कोणत्याही आवाजाचा सामना कसा करायचा याची तालीम घेण्यात आली. सिव्हिल ड्रेसमध्ये काही पोलीस  मॉक ड्रिलसाठी आंदोलक म्हणून हजर  झाले. एकीकडे घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते रस्त्यावर टायर जाळून हिंसक घटना घडवून आणत असताना .  तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या व अग्निशमन वाहनांच्या मदतीने आंदोलन आटोक्यात आणले. जखमी जवान आणि आंदोलकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले हा संपूर्ण प्रकार  मॉक ड्रील दरम्यान  एसडीपीओ संजय पूज्जलवार यांनी घडवून आणला जेणेकरून रामनवमी  मिरवणुकीत कोणताही गोंधळ सहन केला जाणार नाही. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी आणि गुंडगिरीचा मुकाबला करण्यास पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत हे दाखवून दिले .तेव्हा  सर्वसामान्य जनतेनी  हा सण शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करावा असे आवाहन एसडीपीओ संजय पूजलवार व ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी केले आहे.पोलिस हे आपात्कालिन परिस्थितीसाठी नेहमी तत्पर असतात. हे त्यांनी मॉक ड्रीलच्या माध्यमातून दाखवून दिले आहे हा नाट्यक्रमाचा भाग होता

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News