Friday, October 4, 2024
Google search engine
HomeUncategorizedलोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारीचे आयोजन.     

विद्यार्थ्यांनी भरारी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन   

सुरेंद्र इखारे वणी :-   विद्यार्थ्यांमध्ये असणारे विविध सूप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक २ ते ४ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर पुष्पगुच्छ सजावट, मेहंदी, रांगोळी, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी एकल नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धांसह कॅरम आणि बुद्धिबळाची पुढील सामने घेण्यात येतील.
तिसऱ्या दिवशी समूह नृत्य, सुगम संगीत यांच्या सादरीकरणासह स्पर्धांचे अंतिम सामने खेळण्यात येतील. शेवटी समारोपीय कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरणाने या युवा भरारी उत्सवाची सांगता होईल.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अभिजित अणे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे, डॉ.विकास जुनगरी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी प्रा. किसन घोगरे, क्रीडा विभाग संचालक डॉ. उमेश व्यास तथा ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments