5 एप्रिलला वणीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे गौरव यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार होत असलेल्या अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी व स्वातंत्र्याविराचा गौरव करण्यासाठी 5 एप्रिलला वणी शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी दिनांक 1 एप्रिल 2023 रोज विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेची माहिती दिली .या गौरव यात्रेत विधानसभा मतदारसंघातील साधुसंत ,भाविक भक्त तसेच सर्व समाजाच्या सामाजिक संघटना, संस्था व व्यावसायिक संघटनांदेखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता वणीच्या शासकीय मैदानावरून “होय मी सावरकर” अशी टोपी घालून प्रत्येकजण या सभेत सहभागी होणार आहे. यात्रेत स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे एक रथ राहणार असून सावरकरांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित काही देखावे देखील असणार आहे ही गौरव यात्रा शासकीय मैदानातील पाण्याच्या टाकीपासून निघून शहरातील टिळक चौक, गांधी चौक, नटराज चौक, गाडगेबाबा चौक, जामा मस्जिद चौक, भगतसिंग चौक, सावरकर चौक, सुर्योदय चौक, टागोर चौक, महाराष्ट्र बँक चौक, आंबेडकर चौक ते टिळक चौकात या यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेचे नेतृत्व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार करणार आहे गौरव यात्रे नंतर लगेच स्वातंत्रवीर सावरकरांच्या आयुष्याचे गाढे अभ्यासक दयाशंकर तिवारी यांचे व्याख्यान आहे तेव्हा या गौरव यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेला उपस्थित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते,जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, अभिजत ठाकुरवार, संतोष डंभारे यांनी केले आहे. .