-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

गांधी – नेहरू परिवाराचा देशाच्या एकता एकात्मतेसाठी प्राणाची आहुती  –

गांधी – नेहरू परिवाराचा देशाच्या एकता एकात्मतेसाठी प्राणाची आहुती  –   आमदार नितीन राऊत       

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी :-      ज्या गांधी-नेहरू परिवारच्या लोकांनी या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्याच कुटुंबीयांना आज बेघर करण्यात येत आहे ही सत्ताधारी पक्षाची कृती अयोग्य असून त्यांना जनता धडा शिकवेल असे प्रतिपादन आमदार नितीन राऊत यांनी कमाल चौक येथे झालेल्या सभेत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी होते.
नितीन राऊत पुढे म्हणाले की ज्या नेहरू गांधी परिवाराने या देशातील आपली संपत्ती जनतेसाठी दान दिली, आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्याच कुटुंबीयांची आज खासदारकी काढून घेतल्या जात आहेत. राहुल गांधी यांनी २० हजार कोटी रुपये कुठून आले असा प्रश्न विचारला संसदेमध्ये मोदी सरकारला विचारला असता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. हा हुकूमशाहीचा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व असते. परंतु संसदेमध्ये व्यक्तीचे नाव घेऊन जेव्हा बोलले जाते, त्यावेळेस त्या व्यक्तीला संसदेत बोलण्याचा अधिकार असतो. परंतु राहुलजींना संसदेमध्ये बोलू दिल्या गेलं नाही त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील नेते खरगे यांना सुध्दा बोलू दिल्या जात नाही. मंचावर काॅंग्रेसचे युवा नेते कुणाल राऊत यांच्यासह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पार्टी, भारतीय बौद्ध महासभा आदी पक्षाचे प्रमुख नेते मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ‘डरो मत’ ही सभा नागपूरच्या कमल चौकातून सुरू झाली असून या सभेचे लोन इतरत्र सुद्धा पोहोचवल्या जाईल असेही राऊत म्हणाले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News