25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

माणूस कर्तृत्वाने मोठा होतो शिवरायासारखे कर्तुत्व निर्माण करा तुम्ही यशस्वी व्हाल – डॉ. प्रशांत नारनवरे

माणूस कर्तृत्वाने मोठा होतो शिवरायासारखे कर्तुत्व निर्माण करा तुम्ही यशस्वी व्हाल – डॉ. प्रशांत नारनवरे

जयंत साठे नागपूर:     छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व हे प्रत्येक दिवशी स्मरणावे असेच आहे. त्यांचे विचार व कर्तुत्व यांचे नेहमीच स्मरण करत राहावे. हातावरचे रेषांनी भाग्य बदलत नसते. त्यासाठी आपल्या मनगटात जोर असावा लागतो. माणूस हा कर्तुत्वाने मोठा होतो शिवरायासारखे कर्तृत्व निर्माण करा तुम्ही आपल्या आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल असे प्रतिपादन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सामाजिक न्याय पर्व अंतर्गत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले.
महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत दि.१ एप्रिल२०२३ ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘ “सामाजिक न्याय पर्व” हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरिअम सभागृह दिक्षाभूमी नागपूर येथे करण्यात आले होते.
पुढील कार्यक्रमात बोलतांना प्रत्येक महापुरुषांना एका जाती, धर्माच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करतात परंतु शिवाजी महाराजांनी एका जाती व धर्मासाठी स्वराज्याची निर्मिती केली नाही म्हणून ते आज सर्वमान्य आहेत. सर्व जाती धर्म, पंथ यांची भिंत तोडली पाहिजे ती तोडली तरच आपण खरे शिवरायांचे भक्त म्हणवू असेही मा. आयुक्त महोदयांनी यावेळेस सांगितले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा शिवरायांनी दिला आपल्या सर्व जातीसमावेशक रयतेसाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांमध्ये दूरदृष्टी होती. संकटांशी सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात होते. असेही मा. आयुक्त महोदयांनी यावेळी सांगितले.
साहस, धैर्य, धडाडी, संकटांशी भिडण्याची वृत्ती हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावे हाताच्या रेषांवर विश्वास न ठेवता आपल्या मनगटाच्या जोरावर विश्वास ठेवा असे श्री. राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर (महाज्योती) यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात बोलतांना “सामाजिक न्याय पर्व” कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत याविषयी माहिती दिली. सामाजिक न्याय विभाग काय काम करतो याची मांडणी या उपक्रमाअंतर्गत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी सफाई कर्मचाऱ्यांच्या मुली मुलींची निवासी शाळा, वाठोडा नागपूर येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी महारांच्या जीवनातील एका प्रसंगावर नाट्य सादर केले.
सदर कार्यक्रमात श्री. सुरेंद्र पवार, उपायुक्त, तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर तसेच श्री किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद नागपूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी प्रयत्न केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News