भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन
जयंत साठे नागपूर जिल्हा प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागामार्फत दि.१ एप्रिल २०२३ ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘“सामाजिक न्याय पर्व” हा अभिनव उपक्रम समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौक नागपूर येथील संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे. डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक, समाज कल्याण विभाग नागपूर व सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ. सिद्धार्थ गायकवाड, हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अतुल वासनिक, सहायक संचालक, वित्त व लेखा, सुखदेव कौरती, समाज कल्याण अधिकारी, अंजली चिवंडे, भारत मेश्राम, ताई मून टापरे, गिते, निखिल मेश्राम, सरोदे, धवराळ, बोरकर तसेच प्रादेशिक उपायुक, समाज कल्याण विभाग नागपूर व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.