प्रबोधन हाच जयंतीचा उद्देश असावा : डॉ नीरज बोधे
जयंत साठे नागपूर जिल्हा प्रतिनिधी: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अलीकडे देशभर धुमधडाक्यात साजरी होत आहे. नवीन पिढीने त्याला आनंद उत्सवाचे स्वरूप देऊन डीजेच्या तालावर नाचणे गाणे व थिरकने सुरू केलेले आहे. खऱ्या अर्थाने महापुरुषांची जयंती ही प्रबोधनाचा दृष्टिकोन पुढे ठेवून समाजात बंधुभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने साजरी केली पाहिजे व त्यासाठी समाजातील सुशिक्षित व प्रबुद्ध वर्गाने पुढाकार घ्यावा असे आवाहन पाली विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी केले.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पाली व बौद्ध अध्ययन विभागात आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ शैलेंद्र लेंडे व आंबेडकर अध्यासन चे नवनियुक्त प्रमुख डॉक्टर अविनाश फुलझेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
तथागत बुद्धाने सर्वप्रथम भारतात लोकशाहीची मूल्य रुजवली अशी माहिती डॉ अविनाश फुलझेले यांनी दिली, तर डॉ आंबेडकर हे व्यक्ती नसून ते मानव मुक्तीचे तत्वज्ञान असल्याची माहिती डॉ शैलेंद्र लेंडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ तुळसा डोंगरे यांनी, सूत्रसंचालन निवृत्त न्यायाधीश विजय धांडे, यांनी तर समापन सहारे यांनी केला. याप्रसंगी प्रीती रामटेके, निशा वानखेडे, अलका जारुंडे यांनी प्रबोधनात्मक गीते गायली.
कार्यक्रमात पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील प्रा डॉ ज्वाला डोहाने, डॉ सुजित वनकर, प्रा रोमा शिंगाडे, प्रा सरोज वाणी, विद्यार्थी उत्तम शेवडे, सिद्धार्थ फोपरे, दिलीप गायकवाड, चंदा लाडे आदिनी पाहुण्यांचे स्वागत केले.