रमजान ईद अत्यन्त आनंदाने साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध – पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड
सुरेंद्र इखारे वणी – गेल्या 20 ते 25 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. व प्रशासनाचे नाव खराब होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नरत होते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात विविध सण उत्सवाच्या काळात कुठलीही अप्रिय अशी छोटीशी घटना सुद्धा झाली नाही त्याच बरोबर आपल्या सर्वांना ग्वाही देतो की येणारी रमजान ईद सुद्धा अत्यन्त आनंदाने साजरी करण्यात येणार आहे यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असे मत पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांनी व्यक्त केले. यवतमाळ जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस विभाग वणी यांचे सयुक्तविद्यमाणे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुडफ्रायडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद या सर्व धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने वणी येथील शेतकरी मंदिरात स्नेहमीलन(इफ्तार पार्टी) सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. प्रमुख अतिथी डॉ पवन बन्सोड यवतमाळ पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार , उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ उंबरकर, यवतमाळ बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगें, शिंदे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख विनोद मोहितकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी केले तसेच राजाभाऊ पाथरडकर यांनी गणेश उत्सव व दुर्गा उत्सवाचे निमित्ताने सादर करण्यात आलेल्या देखाव्यांचे पारितोषिक जाहीर करून वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी स्नेहमीलन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आमदार संजीवरेड्डी बोडकुरवर म्हणाले शहराच्या शांततेच्या दृष्टीने सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने सण उत्सव साजरे करतात वणी हे संतसाहित्य ,संस्कृती शहराचे वैभव जोपासून सर्व सण आनंदाने साजरे करण्यात येते आणि मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र सण सुध्दा शांततेने व आनंदाने साजरा करण्यात येणार आहे असे मत व्यक्त केले . या स्नेहमीलन सोहळ्याला विविध समाजाचे नागरिक,राजकीय पदाधिकारी, मुस्लिम समाजाचे मौलवी, व मस्जिद कमिटीचे पदाधिकारी, पत्रकार, व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सर्वधर्मीय , सर्वपक्षीय व उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे अल्पोपहार करून रोजा इफ्तार करण्यात आला . कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी उपविभागातिल सर्व पोलीस निरीक्षक, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय आत्राम , व उपनिरीक्षक शेखर वांढरे , प्रभाकर कांबळे, ज्ञानेश्वर आत्राम, यांनी पुढाकार घेतला.