Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणीच्या बामणी फाट्यावर ओव्हरलोड वाहतुकीचा अडथळा *

वणीच्या बामणी फाट्यावर ओव्हरलोड वाहतुकीचा अडथळा *

वणीच्या बामणी फाट्यावर ओव्हरलोड वाहतुकीचा अडथळा *  

वाहतुकीची समस्या कायम* नागरिक त्रस्त*   

वरिष्ठांनकडून वाहतुकीची समस्या दूर करण्याची अपेक्षा       

सुरेंद्र इखारे वणी-   वणी- घुगूस मार्गावरील निळापुर- बामणी या फाट्यावरून कोळशाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या बामणी फाट्यावर कोळशाची वाहने अस्ताव्यस्त उभी करून रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा करीत असल्याने या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनधारक व प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.          वणी तालुक्यातील विविध कोळसा खाणी तील कोळसा वाहतूक याच मार्गाने होत असल्याने दररोज या रस्त्यावरून हजारो टन कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गावरून ट्रॅक, ट्रॅव्हल, टॅक्सी, ऑटो, बस, मोठे डंफार, कंटेनर,यासारखी अवजड वाहने जात असतात तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी सायकलने वणीच्या शाळेत येत असल्याने या मार्गावर अपघाताची भीती कायम आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाने कायम स्वरूपी वाहतूक शिपायाची नियुक्ती करावी  जेणेकरून ओव्हरलोड वाहतुकीला आळा बसून रस्त्यावर अस्ताव्यस्त थांबणाऱ्या वाहनांचा  बंदोबस्त होईल व अपघात होणार नाही.[परंतु ब्राम्हणी फाट्यावर ट्राफिक जाम वाहनांची प्रचंड लाईन त्या ठिकाणी वाहतूक विभागाचा एकही शिपाई वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मोक्यावर हजर नाही मात्र वागदऱ्याजवळ जिथे वाहतुकीची कोणतीही समस्या नसताना चार वाहतूक शिपाई उभे आहे हे प्रत्यक्षदर्शी वाहतूक करणाऱ्या नागरिकांना आढळून आले ]   तेव्हा वाहतूक विभागाने कमीतकमी एका शिपायाची नियुक्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी जेणेकरून अपघात होणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.     कारण वाहतुकीची कोंडी ही शहराची मुख्य समस्या आहे. आणि ती सुटणार असे वणीकरांना वाटत होते.   परंतु वाहतूक विभागाने मनावर जर घेतले तर वाहतुकीची कोंडी एका दिवसात सुटू शकते  परंतु वाहतूक विभागाचे दुसरीकडे लक्ष केंद्रित  असल्याने येथील समस्या दूर होण्याची चिन्ह दिसत नाही  कारण पोलीस संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून समस्या जैसे थे राहणार आहे .   अवैधरित्या फिरणारे ऑटो ,कोळशाचे ट्रक   रस्त्याच्या कडेला तासनतास उभी असतात त्या वाहनाला बगल दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहराची समस्या कायमच राहील. तेव्हा वाहतुकीची कोंडी कोण सोडणार असा प्रश्न वणीकर नागरिक विचारत आहे तेव्हा वरिष्ठांनी विशेष  लक्ष देऊन  ब्राम्हणी फाट्यावरील वाहतुकीची समस्या दूर करावी व नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त  केली आहे. . 

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments