19 C
New York
Saturday, May 18, 2024

बाल श्रामणेरांची दीक्षाभूमी ला भेट

बाल श्रामणेरांची दीक्षाभूमी ला भेट

जयंत साठे नागपूर प्रतिनिधी -:      अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापुर मधील नागसेन नगर बुद्ध विहारातील भिक्खुनी खेमा थेरी (9545166028) यांच्या मार्गदर्शनात श्रामनेरी झालेल्या बाल श्रामनेरांनी आज दुपारी दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली.

यात 6 वर्षापासून तर 10 वर्षाच्या श्रामनेरी पर्यंतच्या श्रामणेरांचा सहभाग होता. शाळेला सुट्ट्या लागल्याने या सुट्टीच्या काळात बालकांनी भिक्षू जीवन व त्यांचे आचार विचार कसे असतात हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी श्रामनेरांची दीक्षा घेतली. या बाल श्रमनेरांनी नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध धम्माशी संबंधित प्रेरणा स्थळांच्या भेटी देण्याचे त्यांनी निश्चित केलेले आहे.

श्रामणेरांची नावे सुद्धा बुद्ध काळातील उत्पलवरणा, विशाखा, सुजाता, कुंडलकेसा, सुकेशनी, सुप्रिया व राहुल अशाप्रकारे देण्यात आली. यावेळी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News