18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

मॅकरून  शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रवेश शुल्कात सूट 

मॅकरून  शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रवेश शुल्कात सूट 

सुरेंद्र इखारे वणी – :     महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचा रौप्य महोत्सवानिमित्त मॅकरुन स्टुडंटस् अकॅडमी सी.बी.एस.ई शाळेत प्रवेश शुल्कात सूट देण्यात आली आहे.           सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरु करण्यात आली असून प्री-प्रायमरी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विशेष सूट अर्थात रौप्य महोत्सवानिमित्त (Silver Jubillee) शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फीस मध्ये 30 %टक्के  तर शहरातील विद्यार्थ्यांना बस फीस कमीतकमी 500 रुपये एव्हढी आकारण्यात आली आहे. तरी या संधीचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे. वरोरा मार्गावरील हार्ट ऑफ सिटी वणीत मॅकरुन प्री प्रायमरी शाळेचा उदघाटन सोहळा 7 जूनला थाटात पार पडला. याप्रसंगी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शाळा प्रशासनाने, शालेय शिक्षण प्रक्रियेतील स्पर्धा विचारात घेऊन पालकावरील  शैक्षणिक अस्थीर्य ताण लक्षात घेत रौप्य महोत्सवानिमित्त (Silver Jubilee)  निर्णय घेऊन  मॅकरुन स्टुडंट अकॅडमीने प्रवेशात सूट देऊन प्रवेश प्रक्रिया आरंभली आहे. प्री- प्रायमरी शाळेत KG 1, KG 2, STD 1, STD 2, STD 3,STD 4th ते 9 वी या वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. त्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष 30%सूट देण्यात आली आहे. यामध्ये प्रवेश शुल्कामध्ये वार्षिक सूट तसेच विद्यार्थ्यांना बस सेवेतही कमी शुल्कतही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संधी केवळ 15 मे पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया रविवारी सुध्दा सुरु राहणार आहे. असे आव्हान संस्थेचे उपसंचालक पियूष पी. आंबटकर यांनी केले आहे.

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News