कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झंझावात
शेतकऱ्यांचे हित चार मतदारसंघातील मतदारांवर
रणधुमाळीत चुरस
सुरेंद्र इखारे वणी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची 28 एप्रिल 2023 ला 18 संचालकांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविले आहे. या निवडणुकीत विरोधकांच्या तोडीचे उमेदवार असल्याने या रणधुमाळीत चुरस निर्माण होऊन विजयाच्या जवळ आहे. चार मतदारसंघातील मतदारांचा कल सध्यातरी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या बाजूने असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे भविष्य उज्वल असणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ असताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिली जात नव्हती अशी शेतकऱ्यांची ओरड होती. परंतु या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे व शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली शक्ती पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मतदारात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन शेतकरी परिवर्तन पॅनलचे दिशेने प्रचाराला रणधुमाळीत उतरले आहे. या रणधुमाळीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार विरोधकांचे समोर उभी ठाकली आहे. त्यामुळे आता चार मतदार संघातील 1855 मतदारांचा कल शेतकरी परिवर्तन पॅनलच्या बाजूने असून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शेतकरी परिवर्तन पॅनलचा झंझावात दिसून येत आहे .त्यामुळे या निवडणुकीत कोण किती जागा जिंकतो याकडे संपूर्ण वणी तालुक्याचे लक्ष लागून आहे मात्र सत्ता कोणाच्या हाती द्यायची अशी मतदारात सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.