वादळीवाऱ्यासह पाऊसाचा कायर गावाला फटका
शेतकर्यांचे मुंग, तीळ व ज्वारीचे नुकसान
बाजारवाडीच्या मुख्यरस्त्यावर झाड कोसळले
सुरेंद्र इखारे वणी – कायर येथे काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने जिल्हा परिषद शाळेतील मोठे झाड कंपाउंडसह बाजारवाडीच्या मुख्यरस्त्यावर कोसळल्याने विद्युत वाहिनीच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होऊन वाहतुकीचा मार्ग बंद झाला परंतु वादळीवाऱ्यात रहदारी नसल्याने अनर्थ टळला. कायर येथे झालेल्या वादळी पावसाने येथील साधू मडावी व अरुण मोहितकर या शेतकऱ्यांच्या शेतातील व परिसरातील 12 ते 15 हेक्टर वरील मुंग,तीळ व ज्वारी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने 29 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे तेव्हा जिल्ह्यातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याचे आला होता . परंतु कायर येथे झालेल्या अवकाळी पावसाने येथील जिल्हा परिषद शाळेतील मोठे वृक्ष कंपाउंडसह उन्मळून पडल्याने कायरच्या बाजारवाडीतील मुख्यरस्ता बंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे तेव्हा ग्रामपंचायत सरपंच नागेश धनकसार व प्रशासनाने या रस्त्यावरील झाडाची विल्हेवाट लावून बाजारवाडीतील रस्त्याची वाहतूक मोकळी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.