ज्येष्ठ नागरीक समाजाचा अमूल्य ठेवा आहे. – गोरक्ष गाडीलकर
जयंत साठे नागपूर: पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटूंब पद्धती होती. ज्येष्ठांना त्यात फार मानाचे स्थान होते. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्या जात होती. आपल्या संस्कृतीचे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करण्याचे काम हे ज्येष्ठांकडून होत असते असे प्रतिपादन गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी सामाजिक न्याय पर्व अंतर्गत आयोजित ज्येष्ठ नागरीक आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमात केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१ एपिल २०२३ ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तसेच माहिती लाभार्थ्याना देण्यासाठी ‘ “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व” हा अभिनव उपक्रम डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरीक आरोग्य तपासणी शिबीर तथा कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांचे मार्फत करण्यात आले होते.
कुटूंबे आता लहान झाली आहेत. त्यामुळे ज्येष्ठांच्या विविध समस्या निर्माण झाले आहेत. या समस्यांचे निराकरण हे शासनामार्फत करण्यात येत आहे. यासाठी नागपूर विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या विविध समस्या सोडविण्याचे कार्य हे ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्यरत विविध संघटना शासनाच्या वतीने करत आहेत असेही श्री.गोरक्ष गाडीलकर अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर यांनी सांगितले.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम या सामाजिक न्याय पर्वात करण्यात येत आहे. सर्व तळागाळातील लाभार्थ्यांना या योजनेंचा लाभ घेता यावा याकरीता वस्ती वस्तीत जावून मार्गदर्शन करण्यात येत आहे. नवीन पिढीत ज्येष्ठ नागरीकांचा आदरभाव फार कमी होत असल्याचे दिसून येते त्यांना तो मिळावा म्हणून ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार समारंभाचे आयोजन या विभागामार्फत करण्यात येत असल्याचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हटले
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. राजेश खवले, संचालकीय व्यवस्थापक, महाज्योती श्री. सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर, श्रीमती अंजली चिवंडे, श्री. अरुण आमले, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरीक सेवा मंडळ, नागपूर तसेच श्री. मिश्रीकोटकर, श्री. रेवतकर, श्री. खडसे, इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती निलिमा मून, श्रीमती शितल गिते, श्रीमती मंजूषा मेश्राम, श्रीमती पेंदाम, श्रीमती पुजा कोडापे, श्रीमती प्रिती नुन्हारे, श्री. दिपक मांटे, श्री. सुशील शिंदे, श्री.निलेश बोबडे, श्री.रमण बिर्जे, श्री.विजय वाकोडीकर, श्री.राजेन्द्र अवधुत, श्री.सुयोग पडाळे, श्री.जितेन्द्र सातपुते सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नागपूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गणवीर, तर आभार प्रदर्शन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांनी केले. तद्नंतर सर्व ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.