वणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्य जाहीर व्याख्यान
सुरेंद्र इखारे वणी – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच यांचे वतीने दिनांक 29 एप्रिल 2023 रोज शनिवारला सायंकाळी 5.00 वाजता एस बी लॉन ,वरोरा रोड वणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्य जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या जाहीर व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री ,दिल्ली सरकार मा राजेंद्रपाल गौतम हे राहणार आहे. प्रमुख पाहुणे मा प्रा डॉ इसादास भडके आंबेडकर विचारवंत, चंद्रपूर , मा प्रा डॉ सागर जाधव ‘ वामनदादा कर्डक’ साहित्याचे अभ्यासक, यवतमाळ मा प्रा डॉ माधव सरकुंडे पुरोगामी विचारवंत, यवतमाळ हे उपस्थित राहणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे व्याख्याते मा राजेंद्रपल गौतम याचे ” भारतीय संविधान आणि भारतीय समाजापुढील आव्हाने ” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे तेव्हा या जाहीर व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष गौतम तेलंग, उपाध्यक्ष रामदास कांबळे, संजय तेलंग,सचिव घनश्याम पाटील, मनोहर ठमके, बंडू कांबळे, नरेश तेलंग, नागोराव सातपुते, घनश्याम ठमके, प्रलय तेलतुंबडे, रमेश तेलंग, मंगल तेलंग, गंगाधर रामटेके, आनंदसेन पाटील, कवडू जीवने, आनंद पाटील, मार्गदर्शक प्रा पुरुषोत्तम पाटील, प्रा श्रीकृष्ण सोनारखन, प्रा दिगंबर पुनवटकरव समस्त समाज बांधवांनी केले आहे.