झरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा।
सुरेंद्र इखारे वणी – झरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करून आज झालेल्या मतमोजणीत विरोधकांचा धुव्वा उडवून महाविकास आघाडीचे 18 चे 18 ही संचालक निवडून आले महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केले .व काँग्रेस बालेकिल्ला राखण्यास सरशी राहीला. झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालकासाठी 30 एप्रिलला निवडणूक होऊ घातली असून आजच या संचालकांची मतमोजणी होऊन महाविकास आघाडीच्या 18 ही संचालकांनी दणदणीत विजय मिळवला. वणी विधानसभा क्षेत्र हा काँगेसचा बाळलेकिल्ला होता आज या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केला आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार व उद्धव ठाकरे गटाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकार यांच्या नेतृत्वात एकतर्फी विजय मिळविला . या निवडणुकीत काँग्रेस व उद्धव ठाकरे च्या पक्षाच्या सदस्य ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून एकतर्फी विजय संपादन केला या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार राजीव कासावार, राजू उपरे, संतोष जंगीलवार, रवी ढेंगळे, निलेश बेलेकार, प्रशांत बघेले, मंगेश मोहितकर, शंकर पाचभाई, गिरीधर उईके, प्रतीक्षा पायताडे, मणिचुडा वैद्य, दुष्यांत उपरे, रविदास झाडे, दयाकर गेडाम, सचिन येले,गंगाधर गोरकुंतवार, अरविंद एनगंटिवार, व राजू मांदुलवार, हे विजयी झाले आहेत.