विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवावे-डॉ चिमणकर
नागपूर जयंत साठे: नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी स्नेह संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मंचावर डॉ. गौतम कांबळे, डॉ. तुळसा डोंगरे, प्रा. सरोज वाणी, डॉ. सुजित बोधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व पाली व बौद्ध अध्ययन विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी यांनी भूषविले होते.
या प्रसंगी डॉ. चिमणकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून समाज उन्नती करिता प्रयत्न करावेत. सर्वांगीण विकासाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे व आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करावा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की मोठ्या संख्येने विभागात उपस्थित असलेले विद्यार्थी हे विभागाच्या विकासाचे सुचक आहे. अशाप्रकारे विभागाची उन्नती व्हावी आणि तद्वतच समाजाची सुद्धा मानसिक उन्नती व्हावी. असा आशावाद त्यांनी प्रकट केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. नीरज बोधी म्हणाले की समाजाला योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम ज्ञानार्जना बरोबर विविध कला गुणांना संपादित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी बहुश्रुत होऊन धम्मज्ञान ग्रहण करावे आणि हे ज्ञान समाजात पेरावे. समाजाच्या उन्नतीसाठी पाली भाषेतील ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी सातत्याने करावे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागात चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ. चिमणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विविध विद्यापीठाचे उत्खननातील चित्रे, महापुरुषांची चित्रे, व्याकरण व बुद्ध तत्त्वज्ञानाला प्रदर्शित करणारी चित्रे निर्माण करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिशा वानखेडे या विद्यार्थिनीने मी सावित्रीबाई बोलतोय हे नाट्य एकांकिका उत्कृष्टरित्या सादर केली. भारत बौद्धमय कसा होईल यावर उत्तम शेवडे यांनी, एकसंघ भारतासाठी अमर सहारे यांनी, बौद्ध संस्कार बाबत प्रा सरोज वाणी यांनी उत्स्फूर्तपणे मते व्यक्त केली.
कथाकथन, काव्यवाचन, गीतगायन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. मालती साखरे यांनी भूषविले. याप्रसंगी काव्यवाचन आणि स्वयंस्फूर्त भाषण यामधून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सरोज वाणी यांनी केले. सत्रांचे संचालन संघर्ष कांबळे, विजय धांडे, बुद्धभूषण खोब्रागडे, दिलीप गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन शुभांगी देव, डॉ. सुजित बोधी, मोरेश्वर मंडपे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विजय वासनिक, राहुल गेडाम, उत्तम शेवडे, प्रा. रेखा बडोले, प्रा रोमा शिंगाडे, प्रा ममता सुखदेवे, प्रा पुष्पा ढाबरे, सुभाष बोंदाडे, डॉ अर्चना लाले, कविता जनबंधू, मधुमती शेंडे, श्रेया नंदागवळी, अलका जारुंडे, प्रीती रामटेके, रंजना वनकर, अन्नपूर्णा गजभिये, रत्नमाला नारनवरे, साधना इंगळे, हर्षवर्धन जिभे, आयुष मेश्राम, रवींद्र वासे, सुरेंद्र पाझारे, सुधाकर थुल, विजय जांगडेकर, सिद्धार्थ फोपरे, सचिन देव, किशोर भैसारे, राजेंद्र डुमरे, बबन मोटघरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.