नागपूरला भारताची राजधानी करा
पीपल्स पैंथरची मागणी.
नागपूर जयंत साठे: – वन, पर्यावरण, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक संपन्नता आणि उदात्त जीवनमूल्यांचं शहर म्हणून नागपूर शहराचा जगभर गौरव आहे भारताचा मध्यबिंदू ( झिरो माईल) नागपुरचं आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ऐतिहासिक भूमीत 14 आक्टोबर 1956 बुद्ध धम्मक्रांतीचे चक्र गतिमान केले.दहाव्या शतकात आदिवासी गोंड राजा बक्त बुलंद शहा (उईके ) यांनी नागपूर शहराची पुनरस्थापना केली. देशातील सर्व राज्यांना जोडणारा आणि सोयीचे असलेले शहर नागपुरचं.त्यामुळे नागपूर शहराला भारताची राजधानी करावी अशी मागणी आमदार निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत पीपल्स पैंथरचे अध्यक्ष अशोक मेश्राम, सरचिटणीस डॉ. भीमराव म्हस्के, कोर कमेटीचे नेते ऍड. लटारी मडावी यांनी केली.
भारताची राजधानी साठी नागपूर शहरचं का निवडण्यात यावे यावर संघटनेच्या नेत्यांनी आपली भूमिका विस्तृतपणे मांडली. नागपूर शहर भारताच्याच नव्हे तर जगाच्या मध्यभागी असलेले शहर आहे. भौगोलिक समतोल या शहराचे विशेष आहे.ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा लक्षात घेतला तर ताम्रपटातील शिलालेखत इसवी. दहाव्या शतकातील नोंदिमध्ये नागपूरचे नांव प्रथम आढळते. देशाचेच नव्हे तर जगाचे अंतर मोजण्यासाठी ज्या बिंदूचा उपयोग केला जातो तो बिंदू झिरो माईल म्हणून नागपूरची ओळख आहे. झिरो माईल स्टोन आणि त्या स्टोन मध्ये दर्शविण्यात आलेले चार घोडे, वाळूचा खडक आणि एक खांब त्याची साक्ष देते.
19 शतकात मध्यप्रांत नावाच्या नवीन राज्याची राजधानी नागपूरच होती.1956 पर्यंत ही राजधानी अस्तित्वात होती. प्रशासकीय केंद्राचा दर्जा सुद्धा नागपूर शहराला मिळाला होता.लोकसंख्येचा विचार केल्यास महाराष्ट्रात प्रथम तर भारतात दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे.हरित पर्यावरण,नैसर्गिक जडण, आणि सांस्कृतिक प्रतिभासंपन्न वारसा असलेलं हे शहर आहे.
तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी वस्तीचे वैज्ञानिक पुरावे या शहरात आढळून येतात. बौद्ध संस्कृतीचे नागलोक आणि आलार, कालामच्या वंशाचे आदिवासी लोक या परिसरात मोठ्या संख्येने आढळून येतात.शहराच्या अवती भवती वीज कोळसा, धरणे विपुल प्रमाणात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी नागपूर जवळच आहे.
वृक्ष आणि प्राण्यांची तोटेम म्हणून सांभाळ करणारे कालचे अस्पृश्य आणि आजचे बौद्ध तसेच आदिवासी परधान, कोईतूर एकच आहेत असा दावा पीपल्स पैंथरच्या नेत्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेकरिता नागभूमी नागपूरचीच निवड केली.1930 मध्ये टाटा समूहाने पहिली कापड गिरणी नागपूर शहरातच सुरु केली.ज्याला औपचारिकपणे सेंट्रल इंडिया स्पीनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड म्हणून ओळखल्या जाते. या गिरणीचे उदघाटन 1जानेवारी 1870 रोजी राणी व्हिटोरिया यांनी केले होते. अशी माहिती पीपल्स पैंथरच्या नेत्यांनी पत्रपरिषदे मध्ये दिली.
टायगर कॅपिटल रिझर्व बँक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमान स्थळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नोबल विजेते रामण विज्ञान केंद्र, संत्रा नगरी, मल्टी मॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब व सर्व राज्यांना जवळ पडेल असे शहर म्हणून नागपूर केंद्रस्थानी आहे.पत्रकार परिषदेला नागपूर शहर अध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव डॉ. गिरीधर धापोळकर, सचिव हेमराज टेम्भूर्णे, उपाध्यक्ष गौतम सातपुते, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्राभाऊ ठाकरे, तालुका अध्यक्ष डॉ. प्रदीप मेश्राम. नागपूर ग्रामीण महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना थुल, वर्धा जिल्हाध्यक्ष मधू ओरके, महासचिव बंडूभाऊ कदम डॉ. विजय शेळके, यांच्या सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.