वणीत राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली तथा जाहीर व्याख्यान
सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे ; महोत्सव समितीचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी – वणी येथे राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समितीद्वारे 31 मे 2023 रोज बुधवारला राजमाता अहिल्यामाई होळकर यांची 298 वि जयंती निमित्त दुपारी 4.00 वाजता ” बाईक रॅली” तथा सायंकाळी 7.00 वाजता ” जाहीर व्याख्यान” शिवतीर्थ परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. या जाहीर व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा प्रा संजय लव्हाळे ,कार्यक्रमाचे उद्घाटक माजी कुलगुरू मा डॉ भालचंद्र चोपणे, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मा प्रा ज्ञानदेव काशिद सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार,बीड हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा प्रदीप बोनगीरवार अध्यक्ष ओ. जा. ज .कृती समिती, मा गौरीशंकर खुराणा अध्यक्ष ज .क .संघटना, मा संबाभाऊ वाघमारे संपर्क प्रमुख रा .च .महासंघ, सौ किरणताई देरकर अध्यक्षा ना. श. फाउंडेशन, सौ संगीताताई खाडे अध्यक्षा ल.ना. स. पतसंस्था, सौ सुनीताताई पचकटे अध्यक्षा रा. अ. हो. महिला विचारमंच, मा अंबादास वागदरकर अध्यक्ष म.से. संघ, संतोष पेंदोर संपादक साप्ताहिक बिरसा संदेश, डॉ अरशद शहा होमिओपॅथी तज्ञ , प्रवीण निकोडे मा. समाज महासंघ, मा रमेश येरने अध्यक्ष सं. ज्ञान प्रसारक मंडळ, मा संजय तेलंग उपाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, मा शंकरराव उरकुडे अध्यक्ष ध. स. सं. समिती वणी, मा पांडुरंगजी पंडिले अध्यक्ष खं. वा. देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, मा सुरेंद्र इखारे उपाध्यक्ष य. हो. सार्वजनिक वाचनालय, मा वसंतराव गोरे अध्यक्ष अ. क. धनगर महासंघ, मा मंगेश चामटे अध्यक्ष ध. स. संघर्ष समिती झरी, मा अतुल बोबडे अध्यक्ष ध. स. संघर्ष समिती मारेगाव, उपस्थित राहणार आहे. राजमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे व्याख्याते मा प्रा ज्ञानदेव काशिद सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार बीड यांचे ” राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य व ओबीसी जातनिहाय जनगणना राष्ट्रहितासाठी काळाची गरज! या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. तेव्हा सर्व समाजबांधवांनी या जाहीर व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय लव्हाळे, वसंत गोरे, रघुनाथ कांडरकर, आशिष साबरे, सुरेंद्र इखारे, सूर्यभान चिडे, नितीन वैद्य, अनिकेत चामाटे, गुरुदेव चिडे, अतुल बोबडे, प्रदीप बोरकुटे, नारायण मांडवकर, सुरेश मांडवकर, महेश लिपटे, सुमेध अघम, संजय चिंचोळकर, राजेंद्र देवडे, रवींद्र आंबटकर, प्रा आनंद बन्सोड, प्रा राम मुडे, सौ लोपामुद्रा आस्कर, तथा धनगर समाज संघर्ष समिती, खंडोबा-वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय, राजमाता अहिल्यामाई होळकर महिला विचारमंच, धनगर अधिकारी/ कर्मचारी संघ व सहआयोजक ओबीसी (VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती तथा समस्त धनगर समाज वणी,मारेगाव,झरी यांनी केले आहे