पुरड येथील महामानव संदेश साप्ताहिकाचे संस्थापक रामकृष्ण तेलंग यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विहाराला 20 हजार रुपयांची भेट
सुरेंद्र इखारे वणी – तालुक्यातील पुरड येथील महामानव संदेश साप्ताहिकाचे संस्थापक रामकृष्ण तेलंग यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विहाराच्या बांधकामासाठी 20 हजार रुपयांची भेट. पुरड येथील महामानव संदेश साप्ताहिकाचे संस्थापक रामकृष्ण तेलंग यांचे 12/5/2013 ला निधन झाले . त्यांना जाऊन आज दहा वर्षे पूर्ण होत आहे . तेव्हा त्याच्या स्मृती ला अभिवादन करण्याकरिता तेलंग परिवार उपस्थित होते यावेळी आयु विवेक रामकृष्ण तेलंग माजी मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय कायर यांनी पुरड येथील विहाराच्या बांधकामासाठी विहार निर्माण समितीला 20 हजार रुपयांची रोख रक्कम भेट दिली आहे . यानिमित्ताने तेलंग परिवाराने महामानव संदेश साप्ताहिकाचे संस्थापक रामकृष्ण तेलंग याना स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या स्मृतीस कोटि कोटी विनम्र अभिवादन करण्यात आले