वाशीम येथे व्हाईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
बंडू निंदेकर वणी – वाशिम येथे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी” व्हाईस ऑफ मीडियाच्या” वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला वाशीम येथील ” वाशीम बोल महाराष्ट्र न्यूज” चे जिल्हा उपसंपादक अशोक कोहळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले . यामध्ये विविध मागण्यांची मागणी करण्यात आली आहे जसे पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याला भरून निधी द्यावा
पत्रकारित पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी
वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा
पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा
कोरोना मुळे जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्स चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे
शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिक यांना मारक आहे लंघु दैनिकांनाही मध्यम दैनिका इतक्याच जाहीराती देण्यात याव्या साप्ताहिकांनाही त्याप्रमाणे जाहिराती देण्यात याव्यात या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.