-1.4 C
New York
Friday, March 1, 2024

वणीत होणार जंगल सत्याग्रह स्मारक

वणीत होणार जंगल सत्याग्रह स्मारक

* राज्यशासनाच्या पुढाकाराने जोपासणार जंगल सत्याग्रहाची स्मृती

सुरेंद्र इखारे वणी:-
भारताला स्वातंत्र्य मिळावे या साठी स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या देशातील नेतृत्वाने विविध मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीस आणण्याचे धोरण स्वीकारून मिठाचा सत्याग्रह, असहकार आंदोलन, जंगल सत्याग्रह अशी आंदोलने उभी झाली होती. प्रति टिळक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदमश्री लोकनायक बापूजी अणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शनात विदर्भात वणी सह विविध ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. त्यास्मृतींना उजाळा देण्यासाठी व या परिसरातील शेतकरी, युवकांना व महिलांना मार्गदर्शनपर केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 25 कोटींची तरतूद केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जी आंदोलने झाली. त्याच्या स्मृती जपण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले आहे. त्या अनुषंगाने विदर्भातील यवतमाळ व अकोला जिल्ह्यात जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. वणी येथे होणाऱ्या या स्मारकात एका दालनात लोकनायक बापूजी अणे यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कामाची माहिती असणार आहे. त्यासोबत बेरोजगार युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, शेतकरी व शेतमजुरांसाठी स्वाभिमानाने जगता यावे यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, उद्योग मार्गदर्शन केंद्र, स्पर्धा परीक्षा तयारी केंद्राची निर्मिती या अंतर्गत होणार आहे.
सदर स्मारक बांधण्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी विदर्भ प्रांत स्तरावतील लोकनायक बापूजी अणे जंगल सत्याग्रह समितीचे कार्याध्यक्ष राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, संयोजक ऍड. अविनाश काळे, उपाध्यक्ष बापू भागवत, अरविंद कोमावार, सचिव- सुनील किटकरू, सहसचिव- संजय बंगाले आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, स्थानिक समितीचे हरिहर भागवत, माधव सरपटवार, अंबर घरोटे, गजानन कासावार यांनी या स्मारकासाठी शहरातील विविध जागेची पाहणी केली आहे. शासकीय कार्यालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News