Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedवणी पोलीस स्टेशनच्या दक्षता हॉल मध्ये " भव्य" रक्तदान शिबिर 

वणी पोलीस स्टेशनच्या दक्षता हॉल मध्ये ” भव्य” रक्तदान शिबिर 

वणी पोलीस स्टेशनच्या दक्षता हॉल मध्ये ” भव्य” रक्तदान शिबिर   

वणी तालुक्यातील जनतेनी रक्तदान करावे; ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचे आवाहन     

 सुरेन्द्र इखारे वणी  :-    यवतमाळ जिल्हा पोलीस द्वारा संपूर्ण जिल्ह्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने वणी पोलीस स्टेशनच्या दक्षता हॉलमध्ये 16 मे 2023 रोज मंगळवारला सकाळी 8.00 ते 5.00 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.               स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त वणी तालुक्यातील सर्व सामान्य जनतेनी रक्तदान करून दुसऱ्या जीवाला जीवनदान दिल पाहिजे . कारण रक्त हे कृत्रिम रित्या तयार करता येत नाही. विशेष म्हणजे रक्तघटक हे ठराविक काळासाठी रक्तपेढी मध्ये साठवून ठेवता येत त्यामुळे रक्तदान शिबिर घेऊन सातत्याने रक्त संकलित करणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना किंवा देशसेवा करणाऱ्या सैनिकांना रक्ताची गरज भासते तेव्हा वेळेची गरज व सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून रक्तदान केले पाहिजे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवनकुमार बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या संकल्पनेत खरे उतरण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार,वणी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, शिरपूर पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी तालुक्यातील समस्त जनतेला रक्तदान करण्यासाठी आवाहन करून रक्तदान शिबिरात सहभाग  नावनोंदवून रक्तदान करावे तसेच  सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुध्दा पुढाकार घेतला आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments