“धम्मपद: निवडक गाथा आणि कथा” या ग्रंथाचा विमोचन समारंभ संपन्न
जयंत साठे नागपूर – : बौद्धाचार्य देविदास राऊत यांचा ग्रंथ “धम्मपद: निवडक गाथा आणि कथा” या ग्रंथाचे विमोचन श्रद्धेय भदंत आर्यन नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते 14 मे 2019 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात करण्यात आले. या ग्रंथावर सुप्रसिद्ध बौद्ध विचारवंत डॉक्टर धनराज डहाट यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. सविता सुमित कांबळे, डॉ. शंकर खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले. धम्मपद हा धार्मिक नितिपद वचनांचा, धार्मिक सुक्तांचा किंवा सुभाषितांचा संग्रह आहे. त्या पदांचा अर्थ समजण्यासाठी त्या संदर्भातील कथा निश्चितपणे सहाय्यक ठरतील असे विचार डॉ.धनराज डहाट यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सदर ग्रंथाचे संकलक बौद्धाचार्य देविदास राऊत यांचा सत्कार संकेत प्रकाशनचे राजप्रिय डहाट यांनी केला. कार्यक्रमाचे संचालन हंसराज भांगे यांनी केले. बौद्धाचार्य शांताराम रंगारी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये प्रा. देविदासराव घोडेस्वार, मिलिंद माने, इ.मो.नारनवरे, विठ्ठलराव डांगरे, वामन सोमकुवर आणि बहुजन हिताय संघाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.