2005 पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेस पात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा.- आमदार ॲड श्री किरणराव सरनाईक
🔹सर्वांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी कटीबद्ध. आझाद मैदान, मुंबई येथील आंदोलनादरम्यान श्री सरनाईक यांचे आश्वासन*.🔸
सुरेंद्र इखारे वणी – नुकतेच 2005 पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आंदोलन उभारले होते . या आंदोलनाला दि 11/ 5/ 2023 रोजी मा. श्री किरण सरनाईक, शिक्षक आमदार, अमरावती विभाग यांनी भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी अमरावती विभागीय शिक्षक संघाच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.उपस्थित सर्व आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा संविधानिक अधिकार आहे. इतर कुठल्याही शासकीय विभागामध्ये अनुदान हा प्रकार नसून त्या सर्व विभागातील 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असून हा अन्याय शासनाने त्वरित दूर करावा अशी मागणी केली . शासनाच्या विविध अधिवेशनादरम्यान जुन्या पेन्शनचा मुद्दा श्री किरण सरनाईक यांनी सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडलेला आहे. जोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत आपण प्रयत्नशील राहू तसेच जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी कटिबद्धता राहू असे विचार व्यक्त केले . यावेळी माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत, पेन्शन आंदोलनाचे पदाधिकारी श्री सुनील भोर यासह शेकडो शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.