पाली विभागात ग्रंथदान समारंभ संपन्न
नागपूर जयंत साठे: –
नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने विभागाला डॉ आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड 1 ते 22 ह्या ग्रंथदानाचा समारंभ नुकताच पार पडला. विभाग प्रमुख म्हणून प्रो डॉ नीरज बोधी यांनी या ग्रंथाचा स्वीकार केला. रामदासपेठेत विद्यापीठाचे स्वतंत्र भव्य ग्रंथालय आहे. परंतु पाली विभागात स्वतःचे स्वतंत्र ग्रंथालय हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे.
समाजातील अभ्यासक, लेखक, उच्चपदस्थ, प्रतिष्ठित, सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांनी आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर स्वतः सोबतच समाजातील गरजूंसाठी व समाजासाठी करावा असे आवाहन ग्रंथदान समारोह प्रसंगी प्रो डॉ नीरज बोधी यांनी अध्यक्ष स्थानावरून केले. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या राहुल सांकृत्त्यायन सभागृहात पार पडला.
पाली व बौद्ध अध्ययन पदव्यूत्तर विभागातील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा संपली. त्यामुळे या बॅचच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्रजीतील संपूर्ण ग्रंथ (खंड) विभागाच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिले. परिवर्तनवादी महापुरुषांची ग्रंथसंपदा भेट देण्याची ही परंपरा दरवर्षी पाळल्या जावी असे आवाहन याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून पालीचे अभ्यासक उत्तम शेवडे यांनी केले.
मंचावर विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी, डॉ सुजित बोधी (वनकर), डॉ तुळसा डोंगरे, डॉ ज्वाला डोहाने, प्रा सरोज वाणी, प्रा ममता सुखदेवे-रामटेके, प्रा पुष्पा ढाबरे-कांबळे, प्रा रोमा शिंगाडे-हर्षवर्धन हे प्राध्यापक उपस्थित होते.
पालीचे विद्यार्थी अन्नपूर्णा गजभिये, अर्चना लाले, आशाअ खाकसे, बबन मोटघरे, भीमराव मेश्राम, दिलीपकुमार गायकवाड, हिरालाल मेश्राम, भिक्खुनी सुबोधी (कुंदा नाले), मोरेश्वर मंडपे, नंदा सांभारे, रंजना वनकर, सतीश नगराळे, शामराव हाडके, सिद्धार्थ फोपरे, उत्तम शेवडे तसेच
बौद्ध अध्ययन चे अलका जारुंडे, अरुण गायकवाड, अरुण पाटील, बाळा बनसोड, चंदा तांबे, देवदत्त मेश्राम, जीवन मेश्राम, केशव मेश्राम, किशोर बिर्ला, किशोर भैसारे, पांडुरंग खडसे, प्रमोद गणवीर, प्रीती रामटेके, राजेंद्रपाल दुमोरे, राणी चांदुरकर, श्रीकांत नंदागवळी, श्रिया नंदागवळी, शुभांगी वासनिक, तारा पाटील, विजय धाबर्डे, विजयकुमार जांगळेकर, विजयकुमार वासनिक, विलास राऊत, वासुदेव बारसागडे आदी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे ही ग्रंथसंपदा भेट देण्यात आली.
प्रथम वर्षाच्या पाली व बौद्ध अध्ययन च्या विद्यार्थ्यांतर्फे अंतीम (सीनियर) वर्षाच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.