**कु.प्रणाली कामटकर ची महाराष्ट्र राज्य सब- जुनिअर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता निवड*
सुरेंद्र इखारेवणी:- पश्चिम बंगाल येथील हुगळी येथे दि:28 मे ते 2 जून रोजी आयोजित सब ज्युनियर गट मुलीच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात संस्कार क्रीडा मंडळ वणी ची खेळाडू कु. प्रणाली सतिश कामटकर हिची निवड झाली असून कु.प्रणाली आपल्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील व प्रशिक्षक रुपेश पिंपळकर, मार्गदर्शक संतोष बेलेकार, सुधिर वांढरे, प्रदीप कौरासे ,गणेश पिदुरकर, सुरज अवताडे, तथा संस्कार क्रीडा मंडळाच्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना देते. संस्कार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विजुभाऊ मुक्केवार, सचिव सय्यद बाबू तथा तालुका क्रीडा अधिकारी सचिन मिलमिले यांनी तिचे कौतुक केले. संस्कार क्रीडा मंडळाच्या यशस्वीतेमागे ऍड. कुणाल चोरडिया यांचा सुद्धा सिंहाचा वाटा राहिला असून वेळोवेळी त्यांचे सहकार्य मंडळास लाभत असते. प्रणाली संस्कार व्हॉलीबॉल च्या मैदानावर नियमितपणे सराव करीत असून क्रीडाक्षेत्रात तिच्या निवडीबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.💐