वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ऍड विनायक एकरे तर उपसभापतीपदी विजय गारघाटे यांची बिनविरोध निवड
निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
सुरेंद्र इखारे वणी :- 28 एप्रिल 2023 रोजी पार पडलेल्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले असून ,सभापति व उपसभापती पदांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज दिनांक 24 मे 2023 रोज बुधवारला दुपारी मुख्य कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यात एकमताने सभापतिपदी ऍड विनायक एकरे तर उपसभापतीपदी विजय गारघाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 14 संचालक निवडून आणले ही निवडणूक भाजपा व शिंदे सेना गटाचे नेतृत्व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले याच्या नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवून बहुमताने विजय खेचून आणला . वणी तालुक्यात चुरशीची समजली जाणारी निवडणूक एकतर्फी झाली . परंतु सभापती व उपसभापतीपदी निवड करताना सर्व 14ही संचालकांना एकत्रित करून त्यांचेकडूनच सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लावायची हे संचालकांकडून निवड करून घेण्यात आली त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वानुमते ऍड विनायक एकरे यांच्या नावाला संमती देऊन अखेर सभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली. उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय गारघाटे यांच्या नावाची सर्वानुमते निवड करून उपसभापतीपदाची माळ टाकण्यात आली. या निवडीच्या वेळी 18 संचालक उपस्थित होते . सभापती व उपसभापतीची निवड झाल्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी सर्व संचालकाचे पुष्पहार घालून स्वागत केले व जयघोषात अभिनंदन करण्यात आले यावेळी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांना मा विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्गदर्शन केले , तसेच यावेळी दिनकर पावडे ,विजय पिदूरकर, विजय गारघाटे, ऍड विनायक एकरे यांनी मनोगत व्यक्त केले सभेचे सूत्रसंचालन संजय पिंपळशेंडे यांनी केले यावेळी संचालक ऍड विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेनुदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर, विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार , प्रमोद वासेकर, बडगरे ,कोंग्रे, सोंकुसरे, उपस्थित होते. या निवडीसाठी भाजपा व शिंदे सेना गटाचे नेतृत्व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार, गजानन विधाते, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, रवी बेलूरकर, सचिन खाडे, संस्थेचे सचिव अशोक झाडे, महेश देठे, विठ्ठल झाडे, भाजपा व शिंदे सेना गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभापती उपसभापतीपदाच्या निवड प्रक्रिया ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भालेराव, संदीप पीसालकर ,यांनी काम पाहिले निवडी नंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. अखेर “वणी 24 न्यूजचे” भाकीत खरे ठरले.