कायरच्या म. ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
सुरेंद्र इखारे वणी – संकल्प ग्रामीण युवक व महिला बाहुउद्देशिय विकास प्रतिष्ठाण पाटण बोरी , व्दारा संचालित म. ज्योतीबा फ़ुले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 89% लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा, कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली आहे.
कु. कोमल अनिल चौधरी (498) मार्क 83% मिळवून महाविद्यालया तुन व कायर परिसरातून प्रथम पटकावला आहे.व कु. सोनाली विश्वास शेंडे (423) मार्के 71% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.आणि तसेच, प्रथम श्रेणीत, कु. भाग्यश्री बोरूले, कु. मयुरी लेनगुळे, कु. दुर्गा पंधरे, यश ईटबोईनवार ,आणि ईतर अनेक विद्यार्थ्यांनी, प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा. श्री युवराज गायकवाड सर व प्राचार्य शारदा लोहकरे ( मॅडम) व सर्व प्राध्यापक वर्गानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.