25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

चला  चला 31 मे ला शिवतीर्थ परिसर ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,वणी      

चला  चला 31 मे ला शिवतीर्थ परिसर ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,वणी          

  राजमाता अहिल्यामाई होळकर यांची 298 वि जयंतीनिमित्त।    

“बाईक रॅली तथा जाहीर व्याख्यान “          

  सुरेंद्र इखारे वणी –    राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समिती द्वारे 31 मे 2023 ला राजमाता अहिल्यामाई होळकर यांची 298 वि जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी होत आहे यानिमित्ताने  भव्य दिव्य बाईक रॅली आणि जाहीर व्याख्यान  आयोजित केले आहे.         अहिल्यामाई होळकर यांची जयंती साजरी करून जनसामान्यांसाठी तो लोकोत्सव व्हावा ह्या उदात्त हेतूने बाईक रॅली व जाहीर व्याख्यान  या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करून आपले  कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  बाईक रॅलीचे आयोजन दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे.  बाईक रॅलीचा प्रारंभ राजमाता जिजाऊ चौक, साई मंदिर, बसस्टँड ,छत्रपती शिवाजी चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, नेताजी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक व शिवतीर्थ परिसराजवळ सांगता त्यानंतर सायंकाळी 7 वाजता ” जाहीर व्याख्यान”  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंतीमहोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा संजय लव्हाळे, उदघाटक डॉ भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू, सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्रबोधनकार ,बीड मा प्रा ज्ञानदेव काशिद यांचे जाहीर व्याख्यान ” राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य व ओबीसी जातनिहाय जनगणना राष्ट्रहितासाठी काळाची गरज” याविषयावर जाहीर व्याख्यान  प्रमुख अतिथी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीपभाऊ बोनगीरवार, जनहित संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संपर्क प्रमुख संभाजी वाघमारे, नारी शक्ती फाउंडेशन अध्यक्षा किरणताई देरकर, पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीताताई खाडे, रा अ हो महिला विचारमंच अध्यक्षा सुनीता पचकटे, मराठा सेवा संघ अध्यक्ष अंबादास वागदरकर, संपादक संतोष पेंदोर, डॉ अरशद शहा, मा प्रवीण निकोडे, संताजी मंडळ अध्यक्ष रमेश येरणे, आंबेडकर विचारमंच उपाध्यक्ष संजय तेलंग, धनगर संघर्ष समिती अध्यक्ष शंकरराव उरकुडे, खंडोबा वाघोबा देवस्थान अध्यक्ष पांडुरंग पंडिले, यशवंतराव होळकर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुरेंद्र इखारे, अधिकारी कर्मचारी धनगर महासंघ अध्यक्ष वसंतराव गोरे, धनगर संघर्ष समिती झरी अध्यक्ष मंगेश चामाटे, धनगर संघर्ष समिती मारेगाव अध्यक्ष अतुल बोबडे उपस्थित राहणार आहे.  तेव्हा बाईक रॅली व प्रबोधनपर कार्यक्रमाला वणी मारेगाव व झरी तालुक्यातील जनतेनी कुटुंबासह आपले आद्यकर्तव्य समजून या लोकोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती महोत्सव समिती वणी अध्यक्ष संजय लव्हाळे, उपाध्यक्ष वसंत गोरे, सचिव रघुनाथ कांडरकर, सहसचिव आशिष साबरे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र इखारे, सूर्यभान चिडे, नितीन वैद्य, अनिकेत चामाटे, गुरुदेव चिडे, अतुल बोबडे, प्रदीप बोरकुटे, नारायण मांडवकर, सुरेश मांडवकर, महेश लिपटे, सुमेध अघम, संजय चिंचोळकर, राजेंद्र देवडे,  रवींद्र आंबतकर, प्रा आनंद बन्सोड, प्रा राम मुडे, सौ लोपामुद्रा आस्कर तथा समस्त धनगर समाज वणी मारेगाव व झरी यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News