25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

मास्टर चेस अकडमी च्या माध्यमातून एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धा थाटात संपन्न

मास्टर चेस अकडमी च्या माध्यमातून एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धा थाटात संपन्न

सुरेंद्र इखारे वणी:-     भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मास्टर चेस अकॅडमी वणी द्वारा जनता विद्यालय वणी येथे एक दिवसीय रॅपिड चेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले       यावेळी रॅपिड चेस स्पर्धेचे अध्यक्षस्थानी जनता विद्यालय वणीचे मुख्याध्यापक गणेश खंडाळकर हे होते . कार्यक्रमाचे उदघाटक वणीचे सुप्रसिद्ध उद्योजक ऍड. कुणाल चोरडिया  तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद निकुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस डॉ. विजय नगराळे, मास्टर चेस अकॅडमी वणीचे संचालक मारुती कोंडांगुर्ले हे प्रामुख्याने उपस्थित होते .
याप्रसंगाने जनता विद्यालय वणीचे मुख्याध्यापक गणेशजी खंडाळकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटक ऍड. कुणालची चोरडिया यांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी पतसंस्था वणीचे अध्यक्ष संजयजी खाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष वंदनाताई आवारी, शिवाजी व्यायाम शाळा वणीचे अध्यक्ष प्रमोदजी निकुरे, गजानन स्पोर्ट्स वणीचे संचालक महेशजी पहापळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ठवरी यांनी केले तसेच  सूत्रसंचालन संतोष बेलेकर यांनी केले  तर आभार  पुरुषोत्तम पिटलावार यांनी मानले . खुल्या गटात प्रथम क्रमांक करण सिंग पवार द्वितीय क्रमांक शिवम कुलमुलकर द्वितीय क्रमांक सिद्धांत पिटलावार चतुर्थ क्रमांक: ओमकार ढवस पाचवा क्रमांक: तन्मय नगराळे यांनी पटकाविला 14 वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक: कुमारी त्रिशा कोंडांगुर्ले द्वितीय क्रमांक: सुमेध वैरागडे तृतीय क्रमांक: राम मसराम चतुर्थ क्रमांक: श्रेयस कोंडांगुर्ले पाचवा क्रमांक: मयंक उपरे, नरेंद्र ठाकरे, सोहम पदलमवार यांना मेडल देण्यात आले. *10 वर्षातील मुलांमध्ये* प्रथम क्रमांक: समर्थ मसराम द्वितीय क्रमांक: पार्थ राठोड तृतीय क्रमांक: अंश कोंडांगुर्ले यांनी पटकाविला. बक्षीसपात्र स्पर्धकांना रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक व मेडल कार्यक्रमाचे उदघाटक ऍड. कुणाल चोरडिया, गजानन स्पोर्ट्स चे संचालक महेश पहापळे या मान्यवरांकडून प्रायोजित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये यवतमाळ, घाटंजी, चंद्रपूर, वरोरा येथील एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला हे विशेष.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News