19 C
New York
Saturday, May 18, 2024

वणी जिल्हा करून नागपूर विभागात समाविष्ठ करण्याची मागणी      

वणी जिल्हा करून नागपूर विभागात समाविष्ठ करण्याची मागणी            

वणी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दिले निवेदन         

  सुरेंद्र इखारे वणी :-  स्वातंत्र्य पूर्व काळात असलेला” वणी जिल्हा” स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात “वणी जिल्हा ” करून ” नागपूर विभागात” समाविष्ठ करण्याच्या मागणीचे निवेदन मो जिया अहेमद रब यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, तसेच मा सचिव महसूल मंत्रालय मुंबई याना देण्यात आले .          यवतमाळ जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे वणी तालुका असून तालुक्यातील शेवटचं गाव बोरी तर तालुक्याचे विभाग अमरावती हे 250 किलोमीटर अंतरावर असल्याने येथील नागरिकांना कार्यालयीन कामकाज करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागतो त्यासोबतच आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागतो त्यामुळे यवतमाळ जिल्हा व अमरावती विभाग सोयीचे नाही त्या दृष्टीने वणी तालुक्यातील ऍड असोसिएशनने एक वणी जिल्हा निर्माण संघर्ष समिती स्थापन करून “वणी जिल्हा” करून नागपूर विभागात समाविष्ठ करावा. यासाठी वणी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी वणी, मारेगाव, झरी, व नव्याने शिरपूर, खैरी(वडकी), चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, व कोरपना या सात तालुक्यांचा  समावेश करून वणी जिल्ह्याची निर्मिती करावी व वणी जिल्हा नागपूर विभागात अंतर्भूत करावा जेणेकरून विभागाचे अंतर कमी होऊन नागरिकांच्या दृष्टीने जवळ होईल तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याचे अंतर वणी ते कोरपना अंतरापेक्षा  कमी आहे व वणी ते कोरपना राज्य महामार्गाने जोडलेला आहे त्यामुळे वणी जिल्हा करावा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे . परंतु वणी शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कारण भारतात इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले इंग्रज सरकारच्या काळात परतंत्र भारतातील “वन” या नावाने ओळखली जाणारी ” वणी” हा स्वातंत्रपूर्व काळात जिल्हा म्हणून अस्तित्वात होता. बंगालच्या फाळणीपर्यंत वणी जिल्हा होता त्यानंतर तापमान वाढू लागल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना सहन झाले नाही त्यामुळे यवतमाळ जिल्हा झाला . तरीही वणीकरांच्या मनात दुःख होते वणीची जनता लढवय्ये आहे म्हणून त्याकाळात स्व हरीश मांढरे यांनी सातत्याने लढा दिला हा लढा कायम राहावा यासाठी वणीतील ऍड असोसिएशनने पुढाकार घेऊन वणी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून संबंधित  निवेदनाच्या प्रति मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा आयुक्त अमरावती विभाग, मा जिल्हाधिकारी यवतमाळ, याना पाठविण्यात आले आहे. यावेळी मो जिया अहेमद रब, ऍड विपलव तेलतुंबडे, ऍड रमेश बंदूरकर, ऍड दिलीप परचाके, ऍड अमोल टोंगे, ऍड अरविंद सिडाम, ऍड गणेश ढवळे, ऍड एच एस तेलतुंबडे, ऍड डी आर वानखेडे, ऍड कविता किन्हेकर, ऍड पी एन कन्नलवार, ऍड शुभम उपासे, ऍड अविनाश बोधाने, ऍड अ एफ सिद्धीकी, ऍड रामेश्वर लोणारे उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News