प्रा. कुमुद पावडे ह्यांचे निधन
समाज एका संस्कृत पंडिताला मुकला- उत्तम शेवडे
नागपूर – जयंत साठे :-. प्रा. कुमुद पावडे जेष्ठ आंबेडकरी स्त्रीवादी लेखिका, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाष्यकार, डर्बन येथे भरलेल्या United nation च्या resizam विरुद्धच्या परिषदेला भारतीय दलित स्त्रियांचे नेतृत्व करणाऱ्या, संस्कृतच्या पंडित असलेल्या, नागपुरात स्वतः प्रथम आंतरजातीय विवाह करून 600 पेक्षा जास्त आंतरजातीय विवाह घडवून आणणाऱ्या, प्रोग्रीसिव वूमन ऑर्गनायझेशन च्या अनेक वर्ष अध्यक्ष राहिल्या आणि त्याद्वारे अनेक परिषदा घेवून महिला मध्ये जागृती निर्माण करणाऱ्या म्हणून देशात त्याचे नाव होते.
अंतस्फोट हे त्यांचे आत्मकथन पहिले दलित स्त्री चे आत्मकथन मानल्या जाते. देशातील विविध विद्यापीठात ते आजही शिकविल्या जाते. ऍड मोतीराम पावडे यांच्या खांद्याला खांदा लावून जवाहर नाईट स्कूल आणि कॉलेज चालविणाऱ्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या संस्कृत पंडित प्रा कुमुदताई पावडे यांचे निधन झाल्याने आंबेडकरी समाजाची हानी झाली असे मत बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.