वणी तालुक्यातील पाच शाळांचा निकाल 100 टक्के ; एका शाळेचा 20 टक्के ; कु जानवी पांडे तालुक्यात प्रथम
89.97 टक्के: 2हजार 424 पैकी 2 हजार 182 विद्यार्थी उत्तीर्ण
सुरेंद्र इखारे वणी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत वणी तालुक्यातून 2 हजार 425 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 2 हजार 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वणी तालुक्यातील निकालाची टक्केवारी 89.97 टक्के आहे वणी तालुक्यात एकूण 42 शाळांमधून 2 हजार 425 विद्यार्थी परीक्षेला बसले यामध्ये शाळांची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे ; न्यू इंग्लिश हायस्कुल पुनवट98.57 टक्के, शासकीय माध्यमिक विद्या वणी 100 टक्के, एस पी एम विद्या वणी 84.58 टक्के, आदर्श विद्या वणी 64.38टक्के, जनता विद्या वणी 89.20, आदर्श विद्या घोंसा 86.74, जिल्हा परिषद कुरइ 97.22 , नवभारत विद्या उकणी 93.75, आदर्श हा साखर कोल 89.47, विवेकानंद विद्या नेरड93.33, विवेकानंद विद्या वणी 82.14, गुरुदेव विद्या शिरपूर 92.30, संताजी इंग्लिश मिडीयम वणी 100, शासकीय अनुसूचित जाती निवासी स्कुल परसोडा 96.55, एस पी पिंपळकर विद्या नायगाव 61.53, लक्ष्मीबाई राजगडकर माध्यमिक आश्रम शिरपूर 89.47, श्री जगन्नाथ महाराज विद्या वणी 20 टक्के, साईकृपा माध्यमिक विद्या मुरधोनी 97.29, के एन राव कातकडे माध्यमिक विद्या चिखलगाव 91.30, जगन्नाथबाब विद्यालय वांजरी 97.22, वणी पब्लिक स्कुल 100, राष्ट्रीय विद्या बोर्डा 90.32, एस पी पिंपळकर माध्यमिक विद्या मेंढोली 82.75, सरस्वती माध्यमिक विद्या मोहर्ली 86.11, राजर्षी शाहू महाराज वणी 100, विठ्ठल पा मांडवकर विद्या तेजापूर 82.35, गिरीजा मध्य विद्या मंदर 88.23, भास्कर ताजने विद्या कळमना 100, ग्रामीण विद्या परमडोह 88.88, जनता विद्या मारेगाव 96.72, ग्रामीण विकास विद्या ब्राम्हणी 80.00 , तुकडोजी महाराज विद्या भालर 97.67, लोकप्रिय विद्या पेटूर 94.87, आदर्श हाय साखर दरा 86.95, आदर्श हाय शिंदोला 90.62, नुसाबई चोपणे विद्या वणी 71.73, लायन्स इंग्लिश मिडीयम वणी 99.74, बालाजी माध्यमिक विद्या सावरला 95.23, विवेकानंद विद्यालय कायर 91.89, राष्ट्रीय विद्यालय राजूर 98.88 , नालंदा विद्यालय वेळाबाई 98.61, पंचशील विद्यालय नांदेपेरा 88.34 टक्के लागला आहे. यामध्ये वणी तालुक्यातील पाच शाळांचा निकाल 100 टक्के असून एका शाळेचा निकाल सर्वात कमी 20 टक्के लागला आहे . वणी तालुक्यातून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यर्थिनी जानवी संजय पांडे हिला 95.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला, वणी पब्लिक स्कुलची विद्यर्थिनी हिमानी निलेश चचडा हिला 95.40टक्के गुण घेऊन दुसरी तर जनता विद्यालयाची विद्यर्थिनी हर्षा विनोद ठामके हिला 95.20 टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तसेच ग्रामीण भागातील विवेकानंद विद्यालय कायर शाळेतील कु भाग्यश्री विनोद उपरे हिने 79 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यात आली आहे त्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक रेखा मडावी, संस्था अध्यक्ष जयंत चव्हाण व संचालक , शिक्षक शिक्षकेत्तर व ग्रामीण भागातील पालकांनी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे .