राजूर गावात प्रतिभाने दाखविली “प्रतिभा”…..!
•नव्या करियरची सुरूवात…. डॉ. बनण्याचे स्वप्न.
सुरेंद्र इखारे वणी:- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सहायक शिक्षक प्रकाश तालावार यांची मुलगी कु प्रतिभा प्रकाश तालावार ही लॉयंस इंग्लिश मिडीयम स्कुल वणी येथे इयत्ता 10 वि ला शिकत होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत इयत्ता दहावीमध्ये प्रतिभा प्रकाश तालावार हिने 86.40 टक्के गुण प्राप्त करून राजूर गावचे नावलौकिक केले असून विशेषतः सायन्स आणि गणितं या विषयामध्येही अव्वल गुण प्राप्त केले आहे . पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याची तयारी दर्शवली आहे या यशाचे श्रेय ती मुख्याध्यापक गोडे सर, शिक्षिका चित्रा देशपांडे, पायल सिंह , आई कोमल, वडील प्रकाश यांना देत आहे.