Sunday, November 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedसंजय गांधी निराधार योजना, व श्रावणबाळ सेवा निवृत्तवेतन योजनेचे १४८ कोटी रुपयाचे...

संजय गांधी निराधार योजना, व श्रावणबाळ सेवा निवृत्तवेतन योजनेचे १४८ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर

संजय गांधी निराधार योजना, व श्रावणबाळ सेवा निवृत्तवेतन योजनेचे १४८ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर

राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा

नागपूर प्रतिनिधी जयंत साठे :-   राज्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाने दिलासा दिला असून अनुसूचित जमातीं घटकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांसाठी शासनाने रुपये १४८ कोटी रुपयांचा निधी राज्यात वितरित केला आहे. सदर निधी लवकरच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तवेतन योजनेचे अनुदान अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे या साठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.४८ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०० कोटी असा एकूण रु.१४८ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिनांक ०२ जून २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे. तसेच मागील आठवडयातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रु.११९७ कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करुन दिलेला असून, आता उपलब्ध करुन देणाऱ्या निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी. सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १०००/- दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधी वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहिती सुंमत भांगे, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी दिली आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments