..*जुनी पेन्शन अभ्यास समितीने राज्यशासनास केला अहवाल सादर..?*
अशोक आकुलवार ( विशेष प्रतिनिधी)
वणी – २००५ पासून नियुक्त राज्य सरकाररी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करता यावी म्हणून गठित करण्यात आलेल्या अभ्यास समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे नुकताच सादर केल्याची माहिती आहे.
… २००५ पासून नियुक्त करण्यात आलेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती. यासाठी राज्यशासनाने आर्थिक डबघाईचे तकलादू कारण पुढे केले होते.
..यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता आणि हा असंतोष विविध स्वरूपात व्यक्त होत होता. तीन महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी संपाच्या रूपाने आपला उग्र असंतोष राज्यशासनास दाखवून दिला होता.
…अखेर शासनाने जुनी ( OPS) आणि नवीन पेन्शन योजना ( NPS) यांचा तुलनात्मक
अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती गठित केली होती.
..*आता या अभ्यास समितीने राज्य सरकारकडे नुकताच आपला अहवाल सादर केल्याची खात्रीलायक माहिती आहे. *
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल केंद्र शासनास सादर झाल्यानंतरच राज्यशासन राज्य कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या अहवालावर विचार करणार असल्याची माहिती आहे.
..राज्यशासनास सादर करण्यात आलेला हा अहवाल सकारात्मक असावा अशी आशा हे कर्मचारी बाळगून आहे.