Wednesday, October 9, 2024
Google search engine
HomeUncategorizedउद्या बिरसा मुंडा शहीद दिन

उद्या बिरसा मुंडा शहीद दिन

उद्या बिरसा मुंडा शहीद दिन

नागपूर जिल्हा प्रतिनिधी जयंत साठे  –    जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा 9 जून रोजी 123 वा शहीद दिन आहे. मूलनिवासी आदिवासी समाजाच्या हक्क, अधिकार व उत्थानासाठी तसेच जल, जमीन व जंगलच्या रक्षणासाठी इंग्रजांशी लढता-लढता वयाच्या 25 व्या वर्षी बिरसा मुंडा झारखंड च्या राची जैलमध्ये शहीद झाले.

बसपा च्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत *शुक्रवार दिनांक 9 जून रोजी सकाळी 10 वाजता राणी दुर्गावती चौक* (बिनाकी ले आऊट जुना कांजी हाऊस रोड) मधील शहीद बिरसा मुंडा ह्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल.

बसपाच्या प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर, बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिवादनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश बसपाचे माजी मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments