वणी नगरीला संपन्न ऐतिहासिक वारसा – अरुणकुमार खैरे
सुरेंद्र इखारे वणी :- निर्गुडेच्या काठावर वसलेल्या वणी नगरीला धार्मिक, सामाजिक,वैचारिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील अत्यंत संपन्न वारसा लाभलेला असून पूर्वी जिल्हा असलेल्या या गावाने विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी येथील ऐतिहासिक वारसा जोपासला आणि वृद्धिंगत केला आहे. असे विचार श्री अरुण कुमार खैरे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या माझ गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेत ” वणीतील ऐतिहासिक चळवळ” या विषयावर ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ वणी चे कार्यकारी अध्यक्ष श्री माधव सरपटवार तथा सचिव डॉ अभिजित अणे उपस्थित होते.
आपल्या संदर्भ संपन्न आणि अभ्यासपूर्ण विवेचनामध्ये अरुणकुमार खैरे यांनी वणी नगरीतील विविध घटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नगरीला दिलेल्या भेटी, शहरातील मान्यवर संस्था , शहरातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वे यांच्या आधारे शहरात चालणाऱ्या विविध चळवळींचे विविधांगी निरूपण करीत वणी चा संपन्न इतिहास जागृत केला.
याप्रसंगी अशोक सोनटक्के आणि नारायण गोडे यांनी समायोजित मतप्रदर्शन करीत आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत किशोर सानप यांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत सादर करताना माधव सरपटवार यांनी वणी नगरीच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले आणि राम मेंगावर यांनी विशेष परिश्रम घेतले.