ओबीसी अस्मिता जागृत करण्यासाठी संवाद यात्रा… कृष्णाजी बेले
नागपूर जयंत साठे – विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने रघुनाथ शेंडे यांच्या नेतृत्वात प्रा. रमेश पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनटक्के यांच्या नियोजनामध्ये दिनांक 6जून ते 11 जून संवाद यात्रा ही निघाली .यवतमाळ स्थित रेस्ट हाऊस मध्ये तेली समाज महासंघाच्या वतीने ओबीसीच्या अस्मितेकरता तेली समाजाची ही संवाद यात्रा आहे. असे मनोगत प्रमुख अतीथी म्हणून बोलताना कृष्णाजी बेले यांनी केले .याप्रसंगी विद्यार्थी आघाडीचे नेते उमेश कोराम यांनी महाजोतीच्या संदर्भातली विस्तृत अशी माहिती या ठिकाणी दिली .आपण आता सामाजिक कार्यासोबत सोशल मीडियाच्या युगात आहोत. त्यामुळे सोशल मीडियाला पुढे करून आपले संघटन वाढवले पाहिजे. असे मत प्रा. सुधीर सुर्वे यांनी व्यक्त केले. तेली समाजासोबतच बहुजन समाजाच्या जागृतीकरता अभियान नावाच मासिक आम्ही चालवतो. ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी भूमिका संजय सोनटक्के यांनी मांडली. विलास काळे यांनी विदर्भ तेली समाज महासंघाची निर्मिती कशी झाली व कोणत्या विचारावर झाली याची संपूर्ण माहिती सभागृहात दिली. संपूर्ण विदर्भामध्ये गाव तिथे तेली समाजाची शाखा निर्माण झाली पाहिजे अशी क्रांतिकारी भूमिका विदर्भ अध्यक्ष रघुनाथराव शेंडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सुनीता काळे, ज्ञानेश्वर रायमल, किशोर सुरकर, विलास कठाने ,मनोज खोडे यांनी केले. याप्रसंगी वैद्यकीय आघाडी अमरावती विभाग प्रमुख म्हणून डॉ. दीपक शिरभाते, यांची नियुक्ती केली गेली . विवेक डेहनकर यांना सेवानिवृत्त शिक्षक आघाडी , अतुल झोपाटे मेडिको आघाडी ,विलास कठाने जिल्हा संघटक घाटंजी विभाग, सोमनकर सर आयटीआय आघाडी प्रमुख पांढरकवडा, मनोज खोडे जिल्हा समन्वयक दारव्हा, रवी चरडे प्रमुख जिल्हा पत्रकार संघटन आघाडी, किशोर सुरकर जिल्हा संघटक , प्रथमेश काळे विद्यार्थी आघाडी प्रमुख , संतोष झेंडे अभियंता आघाडी प्रमुख ,यवतमाळ जिल्हा प्रफुल गुल्हाने वर्धा, यांची विदर्भ समन्वयक ,अजय किनीकर युवक आघाडी ,राजेश गुल्हाने यांची जिल्हा समन्वयक,रुपेश सावरकर संपर्कप्रमुख , गजानन पाटील विभाग प्रमुख अकोला बाजार ,नरेश भागडे जिल्हा समन्वय , एडवोकेट संजू रवी चरडे गभने यांची विधी सल्लागार आघाडी, युवक संघटनेचे संघटक म्हणून दारव्हा येथील धनजय बलखंडे, तर अशोक कारमोरे, ई जी अशोकराव पावडे ,संदीप गुल्हाने, सुरेश वडकर, मारुती गोल्हर, किशोर पाटील यांची उद्योग आघाडी ,किशोर डाफे युवा आघाडी , सुनील महिंद्रे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्या गेली. अशा प्रकारे विदर्भ तेली समाज महासंघाचा संघटनात्मक बांधणी दौरा यवतमाळ मध्ये संपन्न झाला.