बिरसा मुंडा यांना अभिवादन
जयंत साठे प्रतिनिधी नागपूर :- जननायक, क्रांतिवीर, उलगुलान या जल, जमीन व जंगल आंदोलनाचे निर्माते धरती के आबा बिरसा मुंडा यांच्या 123 च्या शहीद दिन निमित्त बसपा ने राणी दुर्गावती मडावी चौकातील बिरसांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
उलगुलान जिंदाबाद, धरती के आबा बिरसा मुंडा अमर रहे, जननायक बिरसा मुंडा अमर रहे, जयभीम-जयबिरसा, दलित आदिवासी ओबीसी एकता जिंदाबाद, जल जमीन जंगल हमारी है अब बहुजन की बारी है, आदिवासी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा आदी उत्साहवर्धक नारे देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, नरेश वासनिक, माजी प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, माजी मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक विकास नागभिडे, ऍड वीरेश वरखडे यांनी सामूहिक माल्यार्पण केले.
याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहने, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, उत्तर नागपूर अध्यक्ष जगदीश गजभिये, रोहित इलपाचे, अंकित थुल, राजेंद्र सुखदेवे, राजरत्न कांबळे, स्नेहल उके, जनार्धन मेंढे, मनीष शिडामे, राजू चांदेकर, समीर कोहाड, पिंटू वरखडे, नितीन डोंगरे, पंकज वासनिक, अनिल मेश्राम, विवेक सांगोळे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.