Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedकलावंतांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटीत व मजबूत होणे काळाची गरज - ॲड.श्याम...

कलावंतांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटीत व मजबूत होणे काळाची गरज – ॲड.श्याम खंडारे,प्रदेश

कलावंतांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटीत व मजबूत होणे काळाची गरज – ॲड.श्याम खंडारे,प्रदेश

नागपूर  जयंत साठे: –   नूकतेच आळंदी येथे वारक-यांवर झालेल्या अमाणूष लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र ऊमटले,महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने ह्याअत्याचाराचा निषेध व ऊच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कचेरीवर निदर्शने करून शासनाला निवेदन सादर करण्याचे आयोजन केले आहे,त्याअनूष॔गाने दि.14 जून रोजी अमरावती जिल्हा कचेरीवर कलावंतांनी धडक दिली व निवेदन सादर केले.
ॲड.श्याम खंडारे ह्यांनी ह्या प्रसंगी कलावंतांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संघटीत व मजबूत होणे काळाची गरज आहे असे आवाहन केले. कलावंत समितीचे विदर्भ प्रमूख मनोहर शहारे व जिल्हा संपर्क प्रमूख रविंद्र जामणीक जिल्हा महीला आघाडी प्रमूख सौ वैशालीताई काळे जिल्हा महीला स॔घटक सौ.आशाताई मेश्राम,सौ.वैशाली ताई काळे निताताई गाढवे, जिल्हा सचीव महीला आघाडी, मधूताई खडसे,राजश्री जवंजाळ,मंगेश धांडेकर,लक्ष्मीबाई पाटील व बहूसंख्य कलावंत ऊपस्थित होते.त्यानी कलावंताच्या प्रश्नावर आपले मनोगत व्यक्त केले.
सरकारचा व पोलीस प्रशासनाचा तोल ढासळलेला असल्याचे चित्र आळंदी येथील भक्ती,शिस्त तथा शांतता प्रिय वारक-यांवर लाठीचार्ज करतांना समस्त महाराष्ट्राने पाहीले.गर्दी नियंत्रणात आणतांना भक्तीप्रिय वारक-यांना संयमाने समजून सांगता आले असते,ते काही आंदोलन ,निदर्शने करीत नव्हते तथा शांतता व सूव्यवस्था बिघडविण्याचे कृत्य करीत नव्हते. असे असतांना लाठीचार्जची का गरज पडली? व त्यातून जी भगदड ऊडाली त्यात निष्पाप महीला,बाल,व वृध्द वारकरी जखमी झालेत. हा प्रश्न महाराष्ट्रातील तीस लाख तळागाळातील कलावंताच्या मनात खदखदत आहे. आणि ह्या ऊद्वेगातून शासनाला मागणी करीत आहेत की, ह्या अत्याचाराची ऊच्चस्तरीय चौकशी करावी,आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहीजे.ईतर प्रकरणासारखे हे प्रकरण सूध्दा दडपल्या जावू नये.कारण वारक-यांच्या अंगावरील चोट ही समस्त कलावंत क्षेत्रात दहशत पसरविणारी ठरली आहे.समता ,बंधूता ,व न्यायाच्या मार्गाने जिवन जगणा-या समाज घटकाचे ह्रदय हेलावणारी घटना आहे.
तळागाळातील कलावंताच्या न्याय्य हक्कासाठी आदरणीय गायक सोमनाथदादा गायकवाड ह्यांचे समर्थ नेतृत्वात काम करणारी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती प्रत्येक जिल्हा कचेरीवर आपला निषेध नोंदवून शासनाला जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देवून संतप्त भावना कळविण्यास निवेदने देत आहेत.कलावंताच्या अस्मितेच्या लढ्यात समस्त गावखेड्यातील कलावंतांनी सहभाग द्यावा असे त्यांनी आवाहन केले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments