*साप्ताहिकांच्या पत्रकारांचा होणार सन्मान*
*व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या अधिवेशनात गौरव*
नागपूर जिल्हा प्रतिनिधी जयंत साठे – : व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, १८ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरातील विनोबा भावे हॉलमध्ये होत आहे. जर्नालिझम डिपार्टमेंट एमजीएम कॅम्पस येथे सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय या अधिवेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष विनोद बोरे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात साप्ताहिक विंगच्यावतीने साप्ताहिकांचे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या के.डी वर्मा (परभणी), काकासाहेब गुटे (लातूर), सुनिल देशमुख (धाराशिव), शांताबाई मोरे (हिंगोली), डॉ. भारती मढवई (नांदेड), मुशीरखान कोटकर, (देऊळगावराजा, जि. बुलढाणा), कृष्णा हावरे (जानेफळ), सुरेश क्षीरसागर (नागपूर), सुनिल पवार (मेहकर), अनुप कुमार भार्गव (वर्धा), गणेश लावणकर (काटोल, जि. नागपूर), विकास बागडी (जालना), वैशाली चवरे (कारंजा), सुरेखा सावळे (बुलढाणा), संजय निकास (अकोला) यांचा समावेश आहे.
साप्ताहिकाशी संबंधित वरील १५ मान्यवरांचा अधिवेशनादरम्यान मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनात पत्रकारांना विमा कवच प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे राज्य अध्यक्ष विनोद बोरे यांनी दिली. अधिवेशनाला साप्ताहिकाशी संबंधित पत्रकारांनी, संपादकांनी मालक व मुद्रकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही बोरे यांनी केले आहे.