दक्षिण नागपुरात बसपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी : – सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बहुजन समाज पार्टी चे नेते उत्तम शेवडे यांच्या निवासस्थानी दक्षिण नागपुरात बसपा ने जनसंपर्क कार्यालय सुरू केले. महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे ह्यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे जनतेकडे दुर्लक्ष आहे. मागील दीड वर्षापासून नागपूर महानगर पालिका बरखास्त असल्याने जनसामान्यांच्या समस्येचा भंडार उभा ठाकलेला आहे. विद्यार्थ्यांच्या, बेरोजगारांच्या, निराधारांच्या, वृद्धांच्या अनेक समस्या आवासुन उभ्या आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यालय प्रमुख उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, महिला आघाडीच्या सुनंदाताई नितनवरे, युवानेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, गौतम गेडाम, शहर प्रभारी विकास नारायने, ओपूल तामगाडगे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष शिवपाल नितनवरे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, शंकर थुल, विलास मुन, सुमित जांभुळकर, हर्षवर्धन डोईफोडे, तपेश पाटील, विशाल बन्सोड, संभाजी लोखंडे, बालचंद जगताप, धनराज हाडके, विद्यार्थी शेवडे, रवी पाटील यांचे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.